अभिनेत्री प्रियंका चोप्रा लाडाने आपल्या पतिदेवांना अशी हाक मारते

By  
on  

बॉलीवूडपासून आपल्या अभिनयाची सुरुवात करत थेट हॉलिवूडपर्यंत मजल मारणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा. गेल्या वर्षी प्रियंकाने निक जोन्ससोबत लग्न करून या लग्नाचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेयर केले. 

सध्या प्रियंका भारतात आपल्या आगामी 'स्काय इज पिंक' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. यामुळे निकने प्रियंकासोबत एक फोटो शेयर करून त्याखाली 'मिस यु' असं लिहिलं आहे. या फोटोमुळे निकने प्रियंकासोबत तिच्या चाहत्यांची सुद्धा मनं जिंकली आहेत. या फोटोला प्रत्युत्तर म्हणून प्रियंकाने सुद्धा  'बाबू आई हैव सो मच फोमो, मिस यू टू.' असं लिहिलं आहे. 

या पोस्टवरून असं कळून येतं कि प्रियंका आपले पतीदेव नीक जोन्सला लाडाने 'बाबू' अशी हाक मारते. प्रियंकाने निकला बाबू या अस्सल भारतीय आणि गोड नावाने संबोधित केल्याने प्रियंकाचे चाहते हे खुश झाले आहेत.

सध्या प्रियंका भारतात 'स्काय इज पिंक' या सिनेमाचं शूटिंग करण्यासाठी भारतात आली आहे. यामुळे या दोघाही नवविवाहित दाम्पत्यांना एकमेकांची खूप आठवण येत असल्याचं लक्षात येत आहे. 

 

(Source: Instagram)

Recommended

Loading...
Share