‘सुपर 30’मधला गणितज्ञ सोडवणार प्रेमाचं समीकरण, सिनेमातील पहिलं गाणं आज रिलीज होणार

By  
on  

‘सुपर 30’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून त्याच्या विषयीची उत्सुकता दाटली आहे. या सिनेमाविषयी आधिकाधिक जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमात केवळ गणितं आणि रुक्ष समीकरणंच नाहीत तर याला रोमान्सचा तडकाही आहे. या सिनेमातील जगराफिया हे गाणं आज रिलीज होणार आहे. या गाण्यात मृणाल ठाकूर आणि ह्र्तिक रोशन यांची केमिस्ट्री दिसून येते. या गाण्याची गोड धून असलेला टीजर हृतिकने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

 

जगराफिया हे गाणं अमिताभ भट्टाचार्यांनी लिहिलं आहे. हिंदी आणि बिहारी शब्दांच्या गोडव्यातील हे गाणं रसिकांना नक्की आवडेल. या गाण्याला उदित नारायण यांचा स्वर साज लाभला आहे. या गाण्याच्या निमित्ताने उदित नारायण आणि हृतिक खुप दिवसांनी एकत्र येत आहेत. ‘सुपर 30’ या सिनेमात तो पटनामधील गणिततज्ञ आनंदकुमार यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. हा सिनेमा 12 जुलैला रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

 

 

Recommended

Loading...
Share