By  
on  

कबीर सिंहची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई, कमावले इतके कोटी

बॉक्स ऑफिसवर सध्या प्रेमाचा रंग चढला आहे. याला कारणीभूत आहे ‘कबीर सिंह’चा फिव्हर. शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमातील शाहिदच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा होत आहे.

 

शुक्रवारी रिलीज झालेल्या या सिनेमाने २०.२१ कोटींची कमाई केली आहे. शनिवारी २२.७१ कोटींची तर सुट्टीदिवशी म्हणजे रविवारी ७०.८३ कोटींची कमाई केली आहे. सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तीन दिवसात इतकी कमाई करणारा कबीर सिंह पद्मावतनंतर दुसरा सिनेमा बनला आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगु सिनेमाचा रिमेक असलेला कबीर सिंह मध्ये शाहिद एका सनकी सर्जनची भूमिका साकारत आहे. रागावर नियंत्रण नसलेला हा सर्जन एका साध्या मुलीच्या प्रेमात पडतो. त्या प्रेमातील चढ उतार शाहिदने उत्तम अभिनयाने सजवले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive