By  
on  

ईशान खट्टर झळकणार का ‘इश्क विश्क’च्या सीक्वेलमध्ये?

२००३ मध्ये शाहिद कपूरने ‘इश्क विश्क’ या सिनेमात बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या सिनेमातील कॉलेज लाईफ लव्हस्टोरीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमात शाहिदसोबत अमृता राव आणि शहनाज ट्रेजरीवाला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या सिनेमात ईशान खट्टरची वर्णी लागण्याची शक्यता आहे. निर्माते ‘इश्व विश्क २’ च्या पटकथेवर विचार करत असल्याचं बोललं जात आहे.

इश्क विश्क हा सिनेमा त्यावेळच्या जनरेशनची गोष्ट सांगणारा सिनेमा होता. त्यामुळे त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. याशिवाय उत्तम संगीत आणि फ्रेश चेहरे यामुळे या सिनेमाला यश मिळालं. ईशानदेखील आजच्या जनरेशनचा चेहरा आहे. त्यामुळे ‘इश्क विश्क’साठी तो एक चांगली निवड होऊ शकेल यात शंका नाही. ‘धडक’ नंतर ईशानने कोणताही सिनेमा साईन केलेला नाही. त्यामुळे खुप दिवसांनी तो एखाद्या सिनेमातून समोर येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive