By  
on  

यासाठी राधिका आपटे बनू शकली नाही ‘विकी डोनर’ची नायिका

चाकोरी बाहेरच्या सिनेमांचा विचार केला जातो त्यावेळी ‘विकी डोनर’ सिनेमाचं नाव आवर्जून येतं. काहीसं हटके कथानक असलेल्या या सिनेमातून आयुष्मान खुराणाने डेब्यु केला होता. या सिनेमाची नायिका होती यामी गौतम. यामीनेही अदाकारीने हा सिनेमा सजवला होता.

पण विकी डोनरसाठी निर्मात्यांची पहिली पसंती होती राधिका आपटेच्या नावाला. पण अवघ्या काही किलोंनी वजन वाढलं असल्याने तिच्या हातून हा सिनेमा गेला. राधिकाने नुकतीच एका चॅट शोमध्ये ही बाब बोलून दाखवली. या सिनेमासाठी विचारणा झाली होती तेव्हा राधिका एक महिन्याच्या सुट्टीवर होती. त्यावेळी तिचं वजन काही किलोंनी वाढलं होतं. तिने वजन कमी करेन असं आश्वासनही निर्मात्यांना दिलं होतं. पण निर्मात्यांना तिच्यावर विश्वास बसला नाही आणि हा सिनेमा तिच्या हातून गेला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I found the most obvious place on a boat to sit. @rekapalli #boat

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

 

या अनुभवातून राधिका खुप काही शिकली आहे. त्यामुळे ती वजनाबाबत अधिकच सतर्क राहू लागली आहे. राधिका आणि आयुष्मान ही जोडी विकी डोनरमध्ये झळकली नसली तरी ‘अंधांधून’मधील त्यांच्या केमिस्ट्रीला लोकांनी पसंतीची पावती दिली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive