By  
on  

करीना कपूर खानने 'अंग्रेजी मीडियम'च्या शूटिंगला केली सुरुवात, हा पहा फर्स्ट लुक

करीना कपूर खान सध्या अनेक महत्वाच्या सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. करीनाने नुकतंच लंडन येथे 'अंग्रेजी मीडियम' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या सिनेमाचे निर्माते 'Maddock Films'ने आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर करीनाच्या सिनेमातील व्यक्तिरेखेचं नाव सुद्धा त्यांनी उघड केले आहे. 

 'Maddock Films'ने ट्विटरवरुन करीनाचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये करीना जीन्स आणि टी-शर्टच्या पेहरावात एकदम बोल्ड दिसून येत आहे. तिच्या डेनिम जीन्सवर पोलिसांचा बॅच दिसून येत आहे. 'नैना' ही व्यक्तिरेखा या सिनेमात करीना साकारणार आहे. 

 

या सिनेमात करीना सोबत इरफान खान प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमासोबत करीन सध्या सैफ अली खान सोबत 'जवानी जानेमन' या सिनेमात झळकणार आहे. तसेच 'गुड न्यूज', 'लाल सिंह चड्डा' आणि 'तख्त' या सिनेमांमध्ये करीना महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Day 1 #angrezimedium #19years #kareenakapoorkhan

A post shared by Poonam Damania (@poonamdamania) on

Recommended

PeepingMoon Exclusive