By  
on  

अग्रेंजी मिडीयमसाठी इरफान खान लंडनमध्ये घेतोय अशी कठोर मेहनत

आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता इरफान खान जेव्हा दुर्धर कर्करोगाने ग्रस्त होता तेव्हा त्याचे असंख्य चाहते त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्याच्या दमदार पुनरागमनासाठी प्रार्थना करत होते. परंतु चाहत्यांना आता त्यासाठी जास्त काळ प्रतिक्षा करावी लागणार नाही. तो पुर्न पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. या वर्षी तो फेब्रुवारीत लंडनमध्ये आपल्या न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमरवर उपचार घेऊन भारतात परतला. पण आता तो सध्या आपलं संपूर्ण लक्ष आगामी सिनेमा अंग्रेजी मिडीयमवर केंद्रित करतोय आणि सूत्रांच्या माहितीनुसार, तो आपले शंभर टक्के योगदान या सिनेमासाठी देत असल्याचे समजते.  

अंग्रेजी मिडीयम सिनेमाच्या सेटवरील जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान खान आठवड्याचे 5-6 दिवसजवळपास 8 तास सलग शूट करतोय. सिनेमाचा महत्तवाचा भाग लंडनमध्ये चित्रीत करायचा असल्याने. सिनेमाच्या टीमने महिन्याभराचं लंडन शेड्यूल आखलं आहे आणि त्यासाठी इरफानची जीवापाड मेहनत सुरु आहे. या दरम्यान एका दिवसाच्या ऑफमध्ये त्याची पत्नी सुतापा त्याचं डॉक्टर चेकअपचं शेड्यूल ठेवते. त्याच्या तब्येतीत सध्या ब-यापैकी सुधारणा आहे. त्याचं हॉस्पिटलसुध्दा लंडनमध्येच असल्याने त्याला शूटींगसोबतच नियमित चेकअपचा ताळमेळ साधणं थोडं सोप्प जातं आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे इरफान आपल्या खाण्याच्या वेळा आणि डॉक्टरांनी दिलेलं डाएट याचं काटोकोर पालन करतोय. 

2017 रोजी प्रदर्शित झालेल्या हिंदी मिडीयमची कथा  अग्रेंजी मिडीयम पुढे घेऊन जाण्यास निर्माता-दिग्दर्शकांसह खुद्द इरफान खानसुध्दा तितकाच उत्साही आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive