By  
on  

कॅन्सरच्या निदानाला एक वर्ष पूर्ण, सोनाली बेंद्रेने शेअर केला हा फोटो

एका वर्षांपूर्वी सोनाली बेंद्रेला हायग्रेड कॅन्सरचं निदान झाल्यावर सगळ्या बॉलिवूडला धक्का बसला होता. सोनालीच्या कुटुंबियांसाठी देखील हा मोठा धक्का होता. ती अलीकडेच न्युयॉर्कमध्ये उपचार घेऊन भारतात परत आली. पण तिला कॅन्सरचं निदान होऊन एक वर्ष नुकतंच पूर्ण झालं. यानिमिताने सोनालीने भावूक पण प्रभावी पोस्ट  शेअर केली आहे.

 

‘वेदनेतही खंबीर रहा, वेदनेच्या काट्यांमधली फुलं वेचायला शिका. कधीही उमलणं शक्य आहे. कसंही उमल हळूवार, जोरात, भयानक, सुंदर या सगळ्यांमधून उमलणं साधायला हवं. मला या सगळ्यात उमलणं शिकवल्याबद्दल खुप आभार’. सोनालीच्या या जिगराबाज पोस्टने अनेकांना प्रेरणा मिळेल यात शंका नाही. सोनाली हळूहळू कामावर परतत आहे. अलीकडेच तिने एक अ‍ॅड शूट केली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive