By  
on  

Trailer Out: एक देश, एक स्वप्न, एक इतिहास अशी भारतीय अवकाश मोहिमेची गाथा सांगतोय 'मिशन मंगल'

अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू यांच्या अभिनयाने सजलेल्या मिशन मंगल  या आगामी सिनेमाचा दमदार ट्रेलर नुकताच लॉंच झाला. क्षय कुमार, तापसी पन्नू, विद्या बालन, शर्मन जोशी, परेश रावल, किर्ती कुल्हारी आदी कलाकार या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहेत. भारताच्या मंगलयान प्रक्षेपणाच्या घडामोडीवर हा सिनेमा बेतला आहे. या टीजरमध्ये सुरुवातीला अक्षय दिसतो पण त्यानंतर दिसते ती सगळ्या आघाड्यांवर सक्षमपणे लढणारी महिला वैज्ञानिकांची तुकडी. अक्षयने अलीकडेच या सिनेमातील महिला वैज्ञानिकांबद्दल मत व्यक्त केलं.

 

जगन शक्ती दिग्दर्शित 'मिशन मंगल' हा सिनेमा येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 

पाहा ट्रेलर :

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive