'साहो'ची रिलीज डेट बदलली, आता या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला 'साहो' येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. परंतु प्रख्यात सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवरून 'साहो' ची रिलीज डेट बदलल्याची माहिती दिली. आता 'साहो' १५ ऑगस्ट ऐवजी ३० ऑगस्ट रोजी सिनेमागृहात झळकणार आहे. 

१५ ऑगस्ट रोजी अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' आणि जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' हे दोन सिनेमे प्रदर्शित होत आहेत. या दोन सिनेमांशी टक्कर टाळण्यासाठी 'साहो'ची रिलीज डेट बदलली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बॉलीवूडच्या या दोन बड्या सिनेमांसोबत प्रदर्शित झाल्यास 'साहो'ला बॉक्स ऑफिसवर आर्थिक फटका सुद्धा बसू शकतो, अशी धास्ती 'साहो'च्या निर्मात्यांना वाटत असावी. त्यामुळे 'साहो' ची रिलीज डेट पुढे ढकलणं हे निर्मात्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. 

 

'साहो' या ऍक्शनपॅक सिनेमाची जबरदस्त उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.'बाहुबली' सिनेमा गाजवल्यानंतर प्रभास या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमात प्रभास-श्रद्धा कपूरसह चंकी पांडे, नील नितिन मुकेश, जैकी श्रॉफ आदी कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. 

 

Recommended

Loading...
Share