'ससुराल सिमर का' मधील बालकलाकाराचा झाला अपघाती मृत्यू

By  
on  

'ससुराल सिमर का' या मालिकेतून लोकप्रिय झालेला बालकलाकार शिवलेख सिंहचा रोड अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवलेख वडील शिवेंद्र सिंह, आई लेखना सिंह आणि नवीन सिंह यांच्यासह रायपूर येथे मुलाखत देण्यासाठी जात होता. त्यावेळी शिवलेख ज्या गाडीमध्ये होता त्या गाडीत आणि ट्रकमध्ये जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात शिवलेखचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. 

 

अपघात झाल्यानंतर ट्रक ड्रायव्हरने जागीच पळ काढला. शिवलेखने 'ससुराल सिमर का','संकटमोचन हनुमान', 'श्रीमान जी श्रीमती जी', 'अकबर-बीरबल'मध्येही यांसारख्या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. तसेच शिवलेख सध्या रेमो डिसोझा आगामी सिनेमातसुद्धा झळकणार होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Udtaa hi firuuu... In khayalo mei.....

A post shared by SHIVLEKH SINGH (@shivlekh) on

शिवलेखच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे समस्त टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. 

Recommended

Loading...
Share