अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' एका रॉकेटसारखा बॉक्स ऑफिसवर घेईल भरारी : संजय बी जुमानी

By  
on  

अक्षय कुमार लवकरच 'मिशन मंगल'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित या सिनेमाची अक्षयच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. 'मिशन मंगल' बद्दल प्रसिद्ध अंक विशेषज्ञ संजय बी जुमानी यांनी भाकीत केलं की एका रॉकेटच्या उड्डाणासारखा 'मिशन मंगल' बॉक्स ऑफिसवर भरारी मारून स्वतःचं अस्तित्व दाखवेल. 

अक्षयसाठी ९आकडा हा लकी आहे. 'केसरी'च्या वेळेस अक्षयने ३,५ आणि ९ या नंबर्सचा चांगला वापर केला. तसेच 'मिशन मंगल' चा ट्रेलर १८ जुलैला प्रदर्शित करण्यात आला. १८ ची फोड केली तर १+८=९. त्यामुळे ९ आकडा अक्षयसाठी लकी आहे. 

 

हा सिनेमा १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. म्हणजेच १+५=६. अक्षयसाठी ६ हा सुद्धा आणखी एक लकी नंबर आहे. अशाप्रकारे अंक विशेषज्ञ संजय बी जुमानी यांनी अक्षयसाठी असलेल्या लकी नंबर्सचा अभ्यास करून त्याद्वारे 'मिशन मंगल' यशस्वी होणार असं भाकीत केलं आहे. आता बॉक्स ऑफिसवर 'मिशन मंगल' कशी बाजी मारणार हे १५ ऑगस्टला कळून येईल. 

 

Recommended

Loading...
Share