ठरलं तर ! कुली नं 1 च्या रिमेकमध्ये टीकू तल्सानिया यांची जागा घेणार हा अभिनेता

By  
on  

'कुली नंबर 1' हा 90 च्या दशकातला गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या अभिनयाने सजलेला डेव्हिड धवन यांचा सुपरहिट कॉमेडी सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. खुद्द डेव्हिड धवनच या सिनेमाची संपूर्ण धम्माल नव्या ढंगात आणि नव्या रुपात प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. या रिमेकमध्ये एक फ्रेश जोडी म्हणजेच वरुण धवन आणि सारा अली खान झळकतेय याबद्दल तुम्हाला माहितच असेल , आणि यामुळे साहजिकच सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता या सिनेमाबाबतची  एक नवी माहिती समोर आली आहे, ती म्हणजे या मूळ सिनेमात टीकू तल्सानिया यांनी साकारलेली इन्स्पेक्टर ही भूमिका आता या रिमेकमध्ये अभिनेता जॉनी लिव्हर साकारणार आहेत. 

या 'कुली नंबर 1'च्या रिमेकमध्ये काम करण्याबाबत जॉनी लिव्हर यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, " माझा आणि डेव्हिडचा फार जुना रॅपो आहे. 'दीवाना- मस्ताना', 'दुल्हन हम ले जाएंगे'  आणि  जुड़वा' 2 यासारख्या सिनेमांत काम केलं आहे. त्याला कॉमेडीची खुप चांगली जाण आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करायला खुप मजा येते." 

 

 

Recommended

Loading...
Share