By  
on  

फरहान म्हणतोय शिबानीला, ‘तुझ्यासाठी, तुझ्यासोबत कायम’

अभिनेता फरहान अख्तरने गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसाठी रोमॅंटिक मेसेज पोस्ट केला आहे. हे दोघेही सध्या बॅंकॉक येथील कोह समुई येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. फरहानने शुक्रवारी शेअर केलेल्या फोटोसोबत हे रोमॅटिंक कॅप्शन दिलं आहे. हा फोटो स्विमिंग पूलमध्ये क्लिक केलेला आहे. रेड कलरच्या स्विम सुटमध्ये शिबानी खुपच हॉट दिसत आहे. ‘तुझ्यासाठी, तुझ्यासोबत कायम’.

शिबानीसोबत फोटो शेअर करण्याची फरहानची पहिलीच वेळ नाही. मागच्या वर्षी त्याने मेक्सिकोमधील सुट्टीचे फोटोही शेअर केले होते. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर फरहान सोनाली बोसच्या ‘द स्काय इज पिंक’ सिनेमात दिसणार आहे. प्रियांका चोप्राही या सिनेमात दिसणार आहे.

याशिवाय फरहान ‘तूफान’ नावाच्या सिनेमात झळकणार असल्याचं समोर आलं आहे. या तो एका बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

At, by and on your side. @shibanidandekar ️ #poolheads #kohsamui #FarOutdoors

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

Recommended

PeepingMoon Exclusive