By  
on  

विदेशी सनीचा साडीतील देसी लूक तुम्हाला तिच्या प्रेमात पाडेल

बॉलीवूड मधली हॉट अभिनेत्री सनी लिओनी सध्या 'कोका कोला' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात सनी लियोनी देसी पेहरावात दिसून येत आहे. नेहमी वेस्टर्न पेहरावात दिसलेली सनी या देसी अंदाजात एकदम सुंदर दिसत आहे. 

या बद्दल एका मुलाखतीत सनी म्हणाली,''मी आजवर नेहमी सिनेमांमध्ये वेस्टर्न ड्रेसमध्ये झळकली आहे. आता या देसी अवतारामुळे मला थोडा ब्रेक मिळाला आहे. मला साडी नेहमीच आवडते. जेव्हा साडी नेसून मी स्वतःला आरशात पाहत होते तेव्हा येणार अनुभव खूप सुखद होता. हितेंद्र कपोपारा यांनी माझा साडीतील लुक डिझाईन केला आहे. हितेंद्र यांच्याकडे वेगवेगळ्या ठिकाणांमधील साड्यांचं कलेक्शन आहे.''

'कोका कोला' सिनेमासाठी भोजपुरी भाषा शिकणं हे सनी लियोनीसाठी आव्हानात्मक होतं. परंतु सनीने हे आव्हान स्वीकारलं. फक्त दिसणंच नाही तर सनी एकदम 'भोजपुरी कुडी' वाटत होती. या सिनेमाला प्रसाद ततिनेनि यांनी दिग्दर्शित केलं आहे. या सिनेमाचं शूटिंग सध्या नोएडा येथे सुरु आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive