By  
on  

ऋषी आणि नितू कपूर यांच्या सोबत रितेश-जेनेलियाने न्यूयॉर्कमध्ये घालवला क्वालिटी टाईम

अभिनेते ऋषी कपूर १० महिन्यांपासून कर्करोगावर उपचार घेण्यासाठी  न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाले आहेत, हे आपण जाणतोच. त्यांच्यासोबत पत्नी अभिनेत्री नीतू कपूर आणि मुलगा अभिनेता रणबीर कपूर हे अगदी सावलीसारखे सोबत असतात. त्यांची मुलगी रिध्दीमा कपूरसुध्दा या कठीण प्रसंगात त्यांच्यामागे खंबीरपणे उभी आहे. ऋषी कपूर यांच्या आजारपणाविशयी खुद्द त्यांनीच चाहत्यांना ट्विटरवरुन काही महिन्यांपूर्वी माहिती दिली होती. त्यांनतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत होते. ऋषीजींचे अनेक जवळचे मित्र, नातेवाईक आणि बॉलिवूडकर हे न्यूयॉर्कमध्ये जाऊन त्यांची विचारपूस करुन आले.त्यांना ज्याप्रकारे आराम आणि बरं वाटेल याची काळजी प्रत्येक जण घे्त असले तरी आता जवळपास दहा महिने होत आले आहेत आणि ऋषीजींना मायदेशी परतण्याची ओढ लागली आहे. 

ऋषी कपूर यांना भेटायला आजवर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी भेटायला गेले आहेत. नुकतीच रितेश देशमुख आपली पत्नी जेनेलियासोबत ऋषी कपूर यांना भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत अभिनेते अनुपम खेर सुद्धा उपस्थित होते. नितु कपूर यांनी या सर्वांचा फोटो त्यांच्या इंस्टाग्रामवरून शेयर केला. 'घरगुती जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी जेनेलिया-रितेश आणि आमचा माणूस अनुपम खेर यांच्यासह आमचं काउंटडाऊन सुरु झालं आहे.'

ऋषी कपूर हे अनेक महिन्यांपासून कँसरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहेत. ऋषी कपूर ऑक्टोबर पर्यंत मायदेशी परततील, अशी त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive