By  
on  

जॉन अब्राहम अभिनीत ‘बाटला हाऊस’ची उपराष्ट्रपती वैकेंय्या नायडू यांच्यासाठी खास झलक

निखिल अडवाणीद्वारा दिग्दर्शित ‘बाटला हाऊस’ हा सिनेमा स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत मृणाल ठाकूरही झळकणार आहे. हा सिनेमा दिल्ली पोलिसांची सात सदस्यांची स्पेशल टीम आणि संशयित अतिरेकी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीची आहे. यात जॉन डीसीपी संजीवकुमार यादव यांच्या भूमिकेत आहे.

 

‘बाटला हाऊस’च्या टीमने नुकतीच उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांची दिल्लीत भेट घेतली. उपराष्ट्रपतींनी त्यांच्या ट्वीटरवर ही बाब शेअर केली आहे. ते म्हणतात, आज अभिनेता जॉन अब्राहम, मृणाल ठाकुर आणि दिग्दर्शक निखिल आडवाणी यांच्या सोबत बाटला हाउस सिनेमाच्या टीमने घरी भेट दिली. यावेळी झालेल्या गप्पांमध्ये त्यांनी सांगितलं की दिल्लीमधील ‘बाटला हाऊस’ घटने मागचं सत्य सगळ्यांसमोर आणणं हा या सिनेमा निर्मिती मागचा हेतू आहे.’ या सिनेमाच्या टीमला माझ्या शुभेच्छा’. 

या भेटीबद्दल जॉन म्हणतो, ‘माननीय उप-राष्ट्रपति एम. वेंकैया नायडू यांना आमचा सिनेमा दाखवणं हा आमच्यासाठी एक सन्मान आहे. सिनेमापाहून ते कोणती प्रतिक्रिया देतात याचीही उत्सुकता आहे.’ भूषण कुमार या सिनेमाचे निर्माते आहेत. 15 ऑगस्ट 2019 ला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive