By  
on  

.....म्हणून अक्षय कुमारची 'मिशन मंगल'च्या पोस्टरमधली जागा योग्य: तापसी पन्नू

सध्या मिशन मंगल सिनेमाचं प्रमोशन जोरात सुरु आहे. याच प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीमध्ये तापसीने दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी तापसीने अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्यासोबत स्क्रीन शेयर करण्याबाबत खुलासा केला,''अक्षय कुमार आणि विद्या बालन या दोन कलाकारांसोबत काम करण्याची संधी नेहमी  मिळत नाही. त्यामुळे या दोघांसोबत अभिनय करण्यास मी खूप उत्सुक होते''

तसेच 'मिशन मंगल' च्या पोस्टरविषयी खूप चर्चा झाली होती. इतर अभिनेत्रींना डावलून अक्षय कुमारला या पोस्टरमध्ये जास्त जागा देण्यात आली असल्याच्या अनेक चर्चा रंगत होत्या. याविषयी तापसी म्हणाली,''हा जरी सत्य घटनेवर आधारित सिनेमा असला तरी याला एक व्यायसायिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे पोस्टरवरील अक्षय कुमारचा चेहरा या सिनेमाचा स्तर उंचावतो. आम्ही पाच अभिनेत्री मिळून सिनेमाला जे ओपनिंग देऊ शकत नाही ते अक्षय कुमार एकट्याने देऊ शकतो. मनापासून सांगयचं झालं तर आम्ही जरी नसलो तरी अक्षय स्वतःच्या नावावर हा सिनेमा यशस्वी करू शकला असता.''

मल्टीस्टारर   'मिशन मंगल'भारताच्या मंगळमोहिमेवर आधारित आहे. या सिनेमात अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, निथ्या मेनन, कीर्ति कुल्हारी आणि शर्मन जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा १५ ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive