By  
on  

'कौन बनेगा करोडपती'च्या ट्यूनला अजय-अतुल देणार स्पेशल टच

मराठमोळी संगीतकार जोडी अजय-अतुल सध्या मराठीसोबतच अनेक हिंदी सिनेमे श्रवणीय करत आहेत. नुकतंच त्यांनी संगीतबद्ध केलेल्या 'सुपर 30' सिनेमातील गाणी लोकप्रिय झाली. ही लोकप्रिय जोडी अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनाने गाजलेल्या केबीसी या शो ला संगीत देणार आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार केबीसी या शोची जी लोकप्रिय धून आहे त्यामध्ये अजय-अतुल थोडा बदल करणार असून स्वतःच्या संगीताचा स्पेशल टच देणार आहेत. याविषयी अजय-अतुल म्हणाले,''कौन बनेगा करोडपती या ऐतिहासिक आणि लोकप्रिय कार्यक्रमाशी जोडणं ही आमच्यासाठी अभिनमानची गोष्ट आहे. केबीसीचा प्रस्ताव जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा लोकांच्या मनात बसलेल्या लोकप्रिय ट्यूनमध्ये बदल करणं हे आमच्यासाठी आव्हानात्मक काम होतं.''

अजय-अतुल पुढे म्हणाले,''आम्ही एका नव्या अंदाजातील ट्यून बनवण्यात यशस्वी झाल्याचा मला आनंद आहे. या नव्या ट्यूनमध्ये आम्ही ऑरकेस्ट्रल सिम्फनीचा उपयोग केला आहे, ज्यामुळे ही ट्यून शानदार झाली आहे. आम्हाला आशा आहे आधीच्या ट्यूनला जसा उत्तम प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे ही नवी ट्यून प्रेक्षकांना तितकीच आवडेल.''

केबीसीचा  ११वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून बिग बी अमिताभ बच्चन याही सिजनला होस्ट करणार आहेत. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive