By  
on  

मंगळ मोहिमेमागची वैज्ञानिकांची जिद्द आणि स्त्री शक्ती दाखवतोय 'मिशन मंगल'चा नवा ट्रेलर

भारताच्या मंगळमोहिमेवर आधारित 'मिशन मंगल' हा सिनेमा येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा नवा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नव्या ट्रेलर मध्ये मंगळमोहिमेमागच्या वैज्ञानिकांची जिद्द, स्त्री शक्ती पाहायला मिळत आहे. 

 

या नव्या ट्रेलरमध्ये विद्या बालन आणि अक्षय कुमार या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळते. विद्या एक कौटुंबिक स्त्री आणि जबाबदार वैज्ञानिक अशा दोन्ही भूमिका पेलताना दिसत आहे. तर काहीही करून मंगळयान अवकाशात जाण्याची जिद्द असलेला अक्षय कुमार पाहायला मिळत आहे. तसेच मंगळयान अवकाशात झेपावल्यानंतर भारतीयांना झालेला आनंद आणि अभिमान या दोन भावना ट्रेलरमध्ये प्रेक्षकांपर्यंत अचूक पोहोचवण्यात आल्या आहेत. 

मल्टीस्टारर  'मिशन मंगल'भारताच्या मंगळमोहिमेवर आधारित आहे. या सिनेमात अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, निथ्या मेनन, कीर्ति कुल्हारी आणि शर्मन जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा १५ ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive