By  
on  

पाहा Photo: 'कुली नं 1' च्या रिमेकमधून उलगडला वरुण धवन आणि सारा अली खानचा फर्स्ट लूक

 'कुली नं. 1' चा रिमेक पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. या रिमेकमध्ये वरुण धवन आणि सारा अली खान प्रमुख भुमिकेत झळकणार आहेत. गोविंदाच्या या सुपरहिट सिनेमाच्या रिमेकची सर्वांना उत्सुकता लागली आहे. नुकतंच या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर चाहत्यांसाठी उलगडण्यात आलं आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखसुध्दा यासोबत देण्यात आली आहे. पुढील वर्षी म्हणजेच 1 मे रोजी 2020 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

कालच आलेल्या नमोशन पोस्टरमध्ये वरुण माॅडर्न कुलीच्या हटके लुकमध्ये पाहायला मिळत आहे. बॅग आणि सुटकेसचा भार सांभाळणा-या कुलीच्या भुमिकेत वरुण दिसत आहे. वरुणचा चेहरा या पोस्टरमध्ये दिसत नसला तरी वरुणच्या लुकची ही छोटीशी झलक त्याच्या फॅन्सना नक्कीच आवडेल. 'नटखट आहे, थोडा वेगळा आहे पण आम्हा सर्वांच्या आवडीचा आहे' असं कॅप्शन या मोशन पोस्टरखाली देण्यात आलं . 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कूली नंबर १ ️ @varundvn @saraalikhan95 Releasing on 1st May 2020 !

A post shared by Hype PR (@hypenq_pr) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive