By  
on  

पाहा Promo: तोंडावर भस्म, डोळ्यांमध्ये अंगार असलेला सैफ अली खानचा 'लाल कप्तान'

सैफ अली खानची 'सेक्रेड गेम्स 2' वेबसिरीज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. पहिल्या सिजनप्रमाणे याही सिजनला अल्पावधीत प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. आज सैफ अली खानचा वाढदिवस आहे. आणि या दिवसाचं औचित्य साधून सैफ अली खानच्या आगामी 'लाल कप्तान' सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. 

चेहऱ्यावर भस्म, डोळ्यांमध्ये दहशत अशा भयानक अवतारातल्या सैफ अली खानला या टीजरमध्ये पाहायला मिळत आहे. 'हर राम का अपना रावण, हर राम का अपना दशहरा' असा डायलॉग बॅकग्राऊंडला ऐकायला मिळतो. 

 

'लाल कप्तान'च्या टीजरसोबत सिनेमाच्या रिलीज डेट सुद्धा उलगडली आहे. नवदीप सिंग दिग्दर्शित 'लाल कप्तान' ११ ऑक्टोबर २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive