वयाच्या ५० व्या वर्षी या प्रसिद्ध अभिनेत्याची आई करतेय शेती

By  
on  

कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय एकदा लोकप्रिय होऊन आर्थिक दृष्ट्या स्थिर झाले की ते आपले मूळ विसरतात. परंतु या गोष्टीला काही कलाकार मात्र अपवाद असतात. प्रसिद्धीचं वलय जरी मिळालं तरी त्यांची मातीशी बांधिलकी कायम असते. बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा हरहुन्नरी अभिनेता रितेश देशमुखची आई वयाच्या ५० व्या वर्षी शेती करत आहे. 

रितेश देशमुखने स्वतःच्या सोशल मीडियावर पोस्ट शेयर करून आई करत असलेल्या शेतीचं कोतुक केलं. रितेश म्हणाला,''मला फार आनंद होत आहे की वयाच्या ५० व्या वर्षी आईने आवडीने शेती करायला सुरुवात केली आहे. आई नेहमीच तिच्या कल्पनांनी आम्हाला प्रेरित करत असते. शेती करण्यासाठी वयाचं बंधन नसतं हेच आईने दाखवून दिले आहे.''

रितेश देशमुख बॉलीवूडमध्ये कार्यरत असला तरी प्रत्येक गोष्टीमधून तो आपलं मराठीपण जपत असतो. रितेशने आईबद्दल अशी पोस्ट टाकून त्याच आईविषयी असलेलं प्रेम आणि आदर पाहायला मिळतो. 

 

Recommended

Loading...
Share