अबब! 'झांझरिया' गाण्यासाठी करिश्मा कपूरने बदलले तब्बल 30 कपडे

By  
on  

अभिनेत्री करिश्मा कपूर ही बॉलीवुडमधली एक सुंदर अभिनेत्री. तिने जरी सिनेमांमधून ब्रेक घेतला तरी जाहिरातींच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. नुकतीच तिने एका मुलाखतीदरम्यान आपल्या करियरमधल्या एका मजेदार आठवणीला उजाळा दिला. 1996 साली आलेल्या 'कृष्णा' या सुपरहिट सिनेमातील 'झांझरिया' गाण्यासाठी तिने तब्बल 30 कपडे बदलले होते.

करिश्मा म्हणाली,"या गाण्यात पुरुष आणि महिला असे दोन व्हर्जन होते. पुरुषांचा जो व्हर्जन होता त्याला वाळवंटातील 50 डिग्री तापमानात शुट करण्यात आलं होतं. तर महिलांचं जे व्हर्जन होतं त्याला मुंबईमध्ये तीन-चार दिवस शुट करण्यात आलं होतं. वाळवंटात शुट करताना तापलेल्या वाळुत पाय भाजले होते. तसेच नाचताना पायातली वाळु डोळ्यात जायची. त्यामुळे गाणं शुट करणं खुप कठीण होतं."

 

करिश्मा पुढे म्हणाली,"जेव्हा महिलांचं व्हर्जन शुट करत होतो. तेव्हा मला 30 वेगवेगळे पोशाख बदलावे लागले होते. प्रत्येक लुकसाठी वेगवेगळा केशसंभार आणि मेकअप करावा लागला होता. त्यामुळे 'झांझरिया' एक नाविन्यपुर्ण गाणंच नाही तर माझ्या करियरमधलं सर्वात आवडतं आणि अविस्मरणीय गाणं आहे"

 

Recommended

Loading...
Share