व्हायरल झालेल्या ‘रानू दी’चा असाही मेकओव्हर, हिमेश रेशमियाने दिली सुवर्णसंधी

By  
on  

पश्चिम बंगालमधील रेल्वे स्टेशनवर गाणा-या एका महिलेचा व्हिडियो व्हायरल झाला होता. विपन्नावस्थेतील ही महिला उदरनिर्वाहासाठी गात असे. हा व्हिडियो इतका व्हायरल झाला की, या महिलेला थेट बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी मिळाली. रानू दी मंडल असं या महिलेचं नाव आहे आणि तिला ब्रेक दिला आहे. हिमेश रेशमियाने.

 

हिमेशने नुकताच रानू दीच्या रेकॉर्डिंगचा व्हिडियो सोशल मिडियावर शेअर केला आहे. यातील रानु दीचा मेक ओव्हर पाहून आश्चर्याने तोंडात बोटं घालाविशी वाटतात. ‘तेरी मेरी कहानी’असे ‘रानू दी’ने रेकॉर्ड केलेल्या गाण्याचे बोल आहेत. हिमेशचा आगामी सिनेमा ‘हॅप्पी हार्डी और हिर’ या चित्रपटात हे गाणे असणार आहे. निराधार असलेल्या रानू दी उपजिविकेसाठी स्टेशनवर गाणं म्हणत असत. त्यांनी गायलेलं ‘एक प्यार का नगमा है’ गाणं इतकं व्हायरल झालं की अनेक ठिकाणाहून त्यांना गाणं गाण्यासाठी बोलावणं येऊ लागलं. सोशल मिडियामुळे त्या रातोरात स्टार झाल्या.

Recommended

Loading...
Share