By  
on  

Video : क्या बात खिलाडी ! अक्षय कुमार म्हणतो, 'आई-वडिलांना वेळ द्या'

अभिनेता अक्षय कुमार आपल्या सामाजिक आणि संवेदनशील सिनेमांसाठी आज ओळखला जातो. सिनेमेच नाही तर तो सतत सामाजिक भान जपण्यात पुढाकार घेतो. सहज बोलनाता देखील तो आयुष्याती काही मौल्यवान गोष्टी सांगून जातो. तसंच तो नेहमी आपल्या कुटुंबाची काळजी घेतानासुध्दा दिसून येतो. तो एक कुटुंबवत्सल अभिनेता म्हणूनही ओळखला जातो. नुकताच त्याने त्याच्या आईसोबतचा एक गोड व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत सर्वांनाच एक सुरेख मेसेज दिला आहे. 

हा व्हिडीओ शेअर करत अक्षय कुमारने ‘लंडनमध्ये आईसोबत थोडा वेळ घालवत आहे. आपण आपल्या आयुष्यात कितीही बिझीअसू पण आपल्या आई वडिलांना जितका शक्य होईल तितका वेळ द्या. त्यांचे वय वाढत आहे याचे भान ठेवा’ असे कॅप्शन दिले आहे. अक्षयचा हा व्हिडीओ चाहत्यांना फार भावला आहे. एकप्रकारे आई वडिलांचा आदर करायला शिका, अशी शिकवण अक्षयने दिलीय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive