Photos : सुष्मिता सेन आणि बॉयफ्रेंड रोहमन शॉलच्या समुद्र सफरीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

By  
on  

अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल नेहमीच चर्चेत असतात. विविध व्हेकेशन्स एन्जॉय करताना  ते पाहायला मिळतात. ह्या लव्हबर्ड्सच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सर्वत्र रंगताना दिसते, त्याला कारणही खास असतं. आपल्या रोमॅंटीक व्हेकेशन्सचे फोटो सुष्मिता नेहमीच सोशल मिडीया अकाऊंटवरुन पोस्ट करत असते. नुकतंच सुष्मिताने पुन्हा एकदा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबतचा एक रोमॅंटीक फोटो  शेअर केला आहे. दोघंही सध्या मालदीव व्हेकेशनवर आहेत. त्यांचा हा रोमॅंटीक हॉलिडे सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरतोय. 

एकमेकांच्या प्रेमात आकंट बुडालेल्या अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांचा फोटो  परफेक्ट कपल गोल्स देतोय. सुष्मिताने व्हाईट शर्ट आणि काळ्या रंगाची बिकीनी घातलीय तर रोहमनसुध्दा व्हाईट आऊटफिटमध्येच आहे. सुष्मिताने या फोटोंना," लव्ह" असं कॅप्शन दिलं आहे. दोघांचीही केमिस्ट्री जबरदस्त असल्याचं यातून दिसतंय, त्यामुळे सुष्मिताचे चाहतेसुध्दा हा फोटो पाहून भलतेच खुश झाले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#love

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

 

अनेक दिवसांपासून सुष्मिता आणि रोहमन एकमेकांना डेट करतायत आणि सार्वजनिकरित्यासुध्दा ते नेहमी आपलं नातं कबूल करताना दिसतात. पण लग्न किंवा साखरपुडा यापैकी कुठलाच निर्णय त्यांनी अद्याप घेतलेला नाही. 

 

Recommended

Loading...
Share