By  
on  

म्हणून अक्षय कुमारचा 'मिशन ऑगस्ट' ठरला यशस्वी

2019 च्या संपूर्ण ऑगस्ट महिन्यात स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर लोकप्रियतेमध्ये बॉलीवूड सुपरस्टार अक्षयकुमार अग्रेसर राहिलेला दिसून आला आहे. मिशन मंगल चित्रपटाच्या यशामूळे खिलाडी कुमार बराच कालावधी नंबर वन स्थानावर राहिलेला दिसून आला आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

ह्या आकडेवारीनुसार, डिजिटल न्युज (सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट), व्हायरल न्युज आणि प्रिंटन्यूजवर ऑगस्टच्या चारही आठवड्यात 100 गुणांसह अक्षय कुमार पहिल्या क्रमांकावर असलेला दिसून आलाय, 29 ऑगस्टनंतर अक्षयच्या रॅंकिंगमध्ये थोडा फरक पडून तो तिस-या स्थानावर पोहोचला. परंतू ऑगस्ट महिन्यातल्या संपूर्ण आकडीवारीवर नजर टाकल्यास दिसून येईल की, अक्षयने सलमान, शाहरुख, रणवीर आणि वरुणला मागे सोडत ऑगस्ट 2019च्या संपूर्ण महिन्यावरच राज्य केलं आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, "अक्षयच्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि पोर्टल्सवर असलेल्या लोकप्रियतेमूळे आणि मिशन मंगलच्या बॉक्स ऑफिसवरच्या धमाकेदार यशामूळे अक्षयच्या लोकप्रियतेत कमालीचा फरक पडला. सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आणि व्हायरल न्यूजमध्ये अक्षयकुमार अग्रेसर स्थानावर राहिला."

 

अश्वनी कौल पूढे सांगतात, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive