By  
on  

सैफ अली खानचं हे ट्रॉन्सफॉर्मेशन गुपित जाणून तुम्ही व्हाल अवाक्

प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी अभिनेत्याला फार मेहनत घ्यावी लागते. बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानची बातच काही और. तो नेहमीच आपल्या सिनेमांच्या निवडीसाठी ओळखला जातो. सध्या त्याच्या आगामी सिनेमासाठी तो प्रचंड मेहनत घेतोय. त्याला ट्रान्सफॉर्मेशन करायची फार मोठी गरज भूमिकेची होती . 

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, सैफ अली खानला ह्या नव्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी सर्वात कठीण नियमांचं पालन करावं लागलं. नवाबने जवळपास तब्बल ११ किलो वजन घटवलं आहे. इतकंच नाही तर आपल्या लांब केसांना कात्री लावून नवा-कोरा स्पोर्ट्स हेअर कट केला आहे. 'तन्हाजी: द अनसंग वारियर'  आणि नागा साधूच्या  'लाल कप्तान'मधील भूमिकेप्रमाणे त्याने आपल्या वजन आणि लूकमध्ये बदल केले आहेत. तर  'जवानी जानेमन'साठी या दोन्ही सिनेमांविरुध्द लुक हवा होता. त्यासाठी त्याने तशी मेहनत घेतली. 

 

महत्त्वाचं म्हणजे नवाबने हे सर्व कुठलाही ट्रेनर किंवा न्यूट्रिशनिस्टच्या मदतीशिवाय हे शक्य केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ,  सैफने या नव्या मेकओव्हरसाठी नो-शुगर, नो-कार्ब्स असं डाएट नाही तर फक्त घरचं जेवण आणि व्यायामाच्या जोरावर वजन घटवण्याचा पराक्रम केला आहे. तेव्हा सैफचा आदर्श आपण सर्वांनीच ठेवायला हवा. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive