By  
on  

शाहरुखच्या बऊआ सिंगशी तुलना झाल्यावर रितेश देशमुख म्हणतो.....

रितेश देशमुखच्या आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या मरजावां सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात रितेश देशमुखची विशेष भूमिका आहे. रितेश या सिनेमात बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारताना दिसत आहे. यावेळी रितेशची तुलना शाहरुखने ‘झिरो’ सिनेमात साकारलेल्या बुटक्या बऊआ सिंगशी होत आहे.

यासंबंधी रितेशला विचारलं असता, त्याने सांगितलं की शाहरुख कमाल अभिनेता आहे. मी त्याची बरोबरी करण्याचा विचार स्वप्नातही करु शकत नाही. मी झिरोच्या सेटवर अनेकदा गेलो आहे. त्यावेळी शाहरुख सरांकडून मी काही टिप्सदेखील घेतल्या आहेत. याशिवाय त्यांना काम करताना पाहण्याचा अनुभव जादुई असतो.’ 
सिद्धार्थ आणि रितेशशिवाय या सिनेमात तारा सुतारिया आणि रकुल प्रीतदेखील आहे. दिव्या खोसला कुमार, भुषण कुमार, क्रिष्णन कुमार हे या सिनेमाचे निर्माते आहेत. हा सिनेमा 8 नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive