By  
on  

Exclusive: तनुश्री दत्ता नाही तर कोयना मित्रा आहे ‘बिग बॉस 13’ची स्पर्धक

सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस 13’ मध्ये कोण कोण स्पर्धक असणार या चर्चेला आता चांगलाच जोर चढला आहे. हा शो 29 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. काही कलाकारांनी या शोमध्ये असल्याच्यी वृत्ताला दुजोरा दिला आहे, तर काही नावांवरुन पडदा उठणं बाकी आहे. या शोच्या दरम्यान पीपिंगमून तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलं आहे. 

‘साकी साकी’ फेम कोयना मित्राने बिग बॉसच्या 13व्या सीझनचा भाग असल्याचं स्पष्ट केलं आहे. याशिवाय मागील वर्षी #meetoo मोहिमेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताला देखील या शोमध्ये भाग घेण्यासाठी विचारलं गेलं होतं. पण तनुश्रीने या शोमध्ये येण्यासाठी नकार दर्शवला आहे. यावर तनुश्री नाराजी व्यक्त करत म्हणते, ‘अशा अफवा पसरवणं ताबडतोब थांबवलं जायला हवं. मागील वर्षीदेखील याबाबत चर्चा होती.’ बिग बॉस 13मध्ये माहिरा शर्मा, पारस छाबड़ा, आरती सिंह, दलजीत कौर, देवोलीना भट्टाचार्जी, सिद्धार्थ शुक्ला, अबू मलिक आणि शहनाज कौर गिल हे स्पर्धक असणार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive