By  
on  

Movie Review : ऋतिक आणि टायगरच्या अभिनयाची जबरदस्त जुगलबंदी 'वॉर'

सिनेमा : वॉर 
दिग्दर्शक:  सिध्दार्थ आनंद 
कलाकार:  ऋतिक रोशन,  टायगर श्रॉफ, वाणी कपूर 
रेटींग : 3.5 मून

बॉलिवूडमध्ये तसा अॅक्शन सिनेमांचा ट्रेंड काही नवीन नाही. अॅक्शन सिनेमांना ड्रामा आणि सस्स्पेन्सचा तडका दिला की मग सोने पें सुहागा. मग थोडीशी प्रेमाची सजावट केली की, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सिनेमा सज्ज. असंच काहीसं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वॉर सिनेमाबाबतीत म्हणावं लागेल. पण ह्या सिनेमाची खासियत म्हणजे एक अनुभवी व एक नव्या पिढीचा अॅक्शन हिरो यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणं म्हणजे दुग्धशर्करा योग. 

कथानक : 

सिध्दार्थ आनंदच्या दिग्दर्शित  यशराज बॅनरखाली तयार झालेला वॉर सिनेमाची कथा टायगर (खालिद) आणि ऋतिक रोशन (कबीर) यांच्याभोवती फिरते. कथा दिल्लीत सुरु होते.  टायगर आणि ऋतिक हे दोघंही आर्मी सोल्जरची व्यक्तिरेखा साकारतायत. आपल्या देशावर असलेली दहशतवाद्यांची टांगती तलावर मोडीत काढण्यासाठी ह्या दोघांनी कंबर कसली आहे. ऋतिकच्या टीममध्ये सामिल होणं तितकंसं सोपं नाही, त्यासाठी टायगरला भलीमोठी अग्निपरिक्षा द्यावी लागते. मुस्लीम धर्मिय असल्याने टायगरवर वारंवार शंका घेऊनच पाहिलं जातं, आणि त्याच्या देशभक्तीची त्याला वारंवार परिक्षा देणं भाग पडतं.  पण वॉर पाहून तुमचे विचार नक्कीच बदलतील.  

ऋतिक आणि टायगर हे दोघंही  अॅक्शनच्या दुनियेचे सुपरहिरो आहेत. सिनेमाची कथा वेगाने पुढे सरकते. कदाचित ते समजुन घेण्यास कदाचित तुम्हाला अडचण येऊ शकते. पण पडद्यावर अशी अॅकेशन फिल्म पाहण्याची मजाच काही और. आर्मी ऑफीसर्सची टीम दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कशी काम करते हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा आहे. वॉर सिनेमात एक ट्विस्ट आणि सस्पेन्ससुध्दा आहे, पण त्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. 
 
दिग्दर्शन 

सिनेमॅटोग्राफीमध्ये सिनेमा सर्वात वरचढ ठरतो. परदेशातल्या अनेक नयनरम्य ठिकाणांचा शुटींगसाठी दिग्दर्शकाने पुरेपूर वापर केला आहे. कथानक आणि दृश्यमिश्रण यांचा ताळमेळ बसविण्यातसुध्दा त्यांना ब-यापैकी यश आलं आहे. 

अभिनय 

अभिनयाच्या बाबतीत म्हणायचं झालं, तर ऋतिक आणि टायगरने जशी अक्शनची जुगलबंदी दाखवलीय. तसीच त्यांच्या अभिनयाचीसुध्दा ही जुगलबंदी आहे. दोघांच्याही अभिनयाला तोड नाही. 

सिनेमा का पाहावा? 

ऋतिक आणि टायगर हा दुग्धशर्करा योग अनुभवण्यासाठी वॉर हा सिनेमा नक्की पाहा. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive