By  
on  

Birthday Special : रेखा यांची ही मराठमोळी 'फटाकडी' लावणी तुम्हाला माहितीय ना ?

रेखा हे नाव जरी उच्चारलं तरी अगदी भारदस्त वाटतं ना ....आणि त्यांची संपूर्ण झगमगाटी सिनेकारकिर्द डोळ्यासमोर झळकते. बॉलिवूडची ही एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस. तामिळनाडूतील चेन्नईमध्ये त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ ला झाला.  भानुरेखा गणेशन हे त्यांचं खरं नाव. आरसपानी सौदर्यांची खाण असलेल्या रेखा एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगनाही . १९६६ मध्ये ‘रंगुला’या तेलगू  सिनेमातून  त्यांनी बाल कलाकार म्हणून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आणि मग बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्री होण्यापर्यंतच्या प्रवासात कधीच मागे वळून पाहिलं नाही. 

रेखाजींच्या बॉलिवूड सिनेमा आणि माईलस्टोन गाण्यांबद्दल तर आपल्या सर्वांनाच माहितीय. पण रेखाजींचं मराठी कनेक्शन तुम्हाला माहितीय का...नसेल ना किंवा तुम्ही म्हणाल मराठी आणि रेखा कसं शक्य आहे?...पण तुम्हाला ते प्रसिध्द गाणं माहितीय ना, 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला..'अहो मग तुम्हाला हे माहित करुन घ्यायला हवं की या लावणीवर चक्क रेखाजी थिरकल्या आहेत. आपल्या सदाबहार नृत्यअदाकारीने त्यांनी मराठीत अक्षरश: 1980 साली धुमाकुळ घातला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Tb

A post shared by Bhanurekha (@rekha_the_actress) on

 

दत्ता केशव दिग्दर्शित 1980 प्रदर्शित झालेल्या फटाकडी या सिनेमातील 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला..' ही फक्कड लावणी रेखाजींनी आपल्या खास शैलीत सादर केली होती. लाल भडक साडी आणि हिरव्या रंगाच्या ब्लाऊजमध्ये रेखाजी अस्सल लावणी नृत्यांगना वाटतायत व त्यांनी कुठलीही मराठी पार्श्वभूमी नसताना एखाद्या अनुभवी लावणी नृत्यांगने इतक्याच त्या बहारदार थिरकल्या.  बाळ पळसुळेंनाृी शब्दबध्द केलेल्या या लावणीला आशाजींनी आपल्या ठसकेबाज आवाजात स्वरासज चढवला. 

 

 

वयाची 65 ओलांडूनही रेखाजी आजही तितक्याच चिरतरुण आहेत. आजच्या तरुण अभिनेलासुध्दा लाजवेल इतकं त्याचं सौंदर्य पाहून सर्वच घायाळ होतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhanurekha (@rekha_the_actress) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive