By  
on  

अभिनेत्रींना इंडस्ट्रीत मिळणा-या मानधनाविषयी करिना कपूर खान म्हणते ....

बॉलिवूडमध्ये आपलं परखड मत व्यक्त करणारी अभिनेत्री म्हणून अभिनेत्री करिना कपूर खान ओळखली जाते. नुकत्याच सुरु असलेल्या  जिओ मामी मूवी मेला विथ स्टार्स' या कार्यक्रमात नुकतंच करिनाने आलिया भट आणि करण जोहरसोबत हजेरी लावली होती. करिनाने सहकलाकारांबद्दल बोलण्या सोबतच इंडस्ट्रीत अभिनेत्रींना मिळणा-या मानधनाविषयी करिना कपूरने आपलं मत व्यक्त केलं. करिना मते इंडस्ट्रीत अभिनेत्री आणि अभिनेत्यांमध्ये कुठलाही भेदभाव करण्यात येऊ नये जे काही दोघांनाही समान मानधन मिळायला हवं. 

करिनाला या मुलाखती दरम्यान विचारणा झाली की तु कधी कुठला सिनेमा मानधन कमी एसल्याने नाकारला आहेस का, तेव्हा करिना सांगते, " नाही. सिनेमा सोडण्याचं कारण काही वेगळं असतं. पण मला असं वाटतं अभिनेत्रीलासुध्दा सहअभिनेत्या एवढंच मानधन मिळावं. त्यासुध्दा तितक्याच सक्षम असतात." 

करण या मुलाखतीत हसून करिनला म्हणतो, "जर तुला आणि अक्षयला समान माधन मिळालं तर, तेव्हा करिना म्हणते प्लिज मला तुम्ही अक्षय कुमारला जितकं मानधन देता तितकं द्या. नाहीतर मी 'मामी'lतून निघून जाईन." यावर एकच हशा पिकला. 

करिना कपूर खान आणि अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला गुड न्यूज हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive