By  
on  

बॉलिवूडच्या ह्या प्रसिध्द अभिनेत्रीच्या भावाला करायचंय मराठीत काम

प्रसिध्द खलनायक आणि क्राईम मास्टर गो गो म्हणून प्रसिध्द असणारे शक्ती कपूर आणि बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री श्रध्दा कपूर हिचा भाऊ सिध्दांत कपूर लवकरच 'यारम' या सिनेमाद्वारे बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. त्याला मराठी सिनेमांमध्ये काम करण्याची खुप इच्छा आहे. हे त्याने नुकतंच एका पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. पुण्यात 'यारम'ची पत्रकार परिषद होती तेव्हा त्याने पत्रकारांशी मराठीत मनमोकळ्या गप्पा मारल्या. 

अभिनेता सिध्दांत कपूरला मराठीत काम करायचंय असं त्याने ह्या पत्रकार परिषदेत सांगितलं. सिध्दार्थ म्हणतो, दादा कोंडकेंच्या सिनेमाचा खुप मोठा फॅन आहे. त्यांच्या विनोदाचं अचूक टायमिंग मला खुप आवडतं. म्हणून त्या सिनेमांपासूनच मला मराठी सिनेमात काम करण्याची विशेष आवड आहे.

घरात पंजाबी आणि मराठी मिश्रीत वातावरण आहे. वडील शक्ती कपूर  पंजाबी तर आई शिवानी कोल्हापुरे महाराष्ट्रीयन. पण घरात असताना मात्र मी आई आणि शिवानी सोबत मराठीतच संवाद साधतो. एकूणच आमच्या घरात मराठमोळं वातावरण असतं.  

सिध्दांत कपूर, प्रतिक बब्बर आणि प्यार का पंचनामा फेम इशिता राज शर्मा व इश्कबाज फेम सुभा यांची प्रमुख भूमिका असलेला यारम येत्या 18 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive