जॉन अब्राहमच्या ‘मुंबई सागा’मध्ये जॅकी श्रॉफ ऐवजी महेश मांजरेकरांची वर्णी

By  
on  

दिग्दर्शक संजय गुप्ता यांचा मल्टीस्टारर सिनेमा ‘मुंबई सागा’ चर्चेत आहे. या सिनेमात इम्रान हाश्मी आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिननेमात जॅकी श्रॉफदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. पण जॅकी यांनी हा सिनेमा सोडल्याचं समोर येत आहे. जॅकी यांच्या तारखा या सिनेमाच्या शेड्युलशी न जुळल्याने त्यांना हा सिनेमा सोडावा लागला.

जॅकी यांच्या जागी अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची वर्णी लागली आहे.  महेश यांच्या निवडीबाबत निर्माते भुषण कुमार म्हणतात, ‘महेश एक उत्तम कलाकार आहेत’. त्यांची अभिनय प्रतिभा दिवसेंदिवस अधिकच बहरत आहे.’ या सिनेमात महेश यांचा डबल रोल असल्याचं सुत्रांकडून समजलं आहे. या सिनेमात जॉन अब्राहम, इम्रान हाश्मी, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोहित रॉय आणि अमोल गुप्ते हे कलाकार आहेत.

कृष्ण कुमार आणि अनुराधा गुप्ता हे या सिनेमाचे निर्माते आहेत. गॅंगस्टर ड्रामा असलेल्या सिनेमात जॉन अब्राहम गॅंगस्टरच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात बरेच कलाकार एकत्र असल्याने रसिकांची उत्सुकता वाढली आहे. हा सिनेमा 2020च्या जूनमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

Recommended

Loading...
Share