By  
on  

OMG ! रणबीर कपूर -आलिया भटच्या लग्नपत्रिकेचे फोटो झाले व्हायरल, वाचा सविस्तर

बॉलिवूडमधले सध्या चर्चेत असलेलं टॉप मोस्ट कपल म्हणजे आलिया भट आणि रणबीर कपूर. या लव्हबर्ड्सच्या प्रेमाचे किस्से आपण नेहमीच एकत आलो आहोत. रणबीरच्या कुटुंबियांसोबत आलियाची असलेली जवळीक पण सर्वांना चांगलीच माहितीय. पण आता या सेलिब्रिटी कपलच्या लग्नाची पत्रिका सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होतेय. वाचून आश्चर्या वाटलं ना, आलिया-रणबीर लग्न करतायत. या आमंत्रण पत्रिकेवरील तारखेनुसार आलियासोबत रणबीरचं लग्न पुढील वर्षी 22 जानेवारी 2020 रोजी निश्चित आहे. 

ट्विटरपासून व्हॉट्स अॅपपर्यंत सर्व सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर धुमाकुळ घालणा-या या आमंत्रण पत्रिकेवर लग्नाचं ठिकाण म्हणून राजस्थानच्या जोधपूर येथील उम्मेद भवनचा उल्लेख आहे. पण ही आमंत्रणपत्रिका सपशेल फसवी आहे. ही वाचकाच लगेच हा फरक जाणवतो. दोघांच्याही नावामध्ये ब-याच चुका आढळल्या आहेत. 

   

 

काही दिवसांपुर्वी ऋषी कपूर यांनी देखील भारतात परत आल्यावर रणबीरचं लग्न पहायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली होती. यावरून ही जोडी लग्नाच्या बंधनात अडकणार की काय अशी चर्चा देखील सुरु आहे. रणबीर-आलिया या जोडीचा ‘ब्रम्हास्त्र’ हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive