By  
on  

Housefull 4 Review: ‘हाऊसफुल 4’ मुळे या दिवाळीत बरसात होणार हास्याची

सिनेमा:  हाउसफुल 4 
दिग्दर्शक : फरहाद सामजी 
कलाकार : अक्षय कुमार, रितेश देशमुख, कृती सॅनॉन, कृती खरबंदा, बॉबी देओल, पूजा हेगड़े, राणा दग्गुबती, चंकी पांडे, जॉनी लीवर

रेटिंग: 4 मून

हाऊसफुल फ्रॅंचाईजीचा हा चौथा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. आधीच्या तिनही सिनेमांपेक्षा या सिनेमाचं कथानक रंजक आहेच, पणा प्रेक्षकांना हास्याचा जादा डोस मिळेल यात शंका नाही. 

कथानक: 
माईकल भाई (शरद केळकर)चं कर्ज वेळेवर न चुकवू शकल्याने अक्षय (बाला आणि हॅरी) रितेश (बांगडू महाराज आणि रॉय) आणि बॉबी ( धरम पुत्र आणि मैक्स) तीन सुंदर मुली कृती सॅनॉन (राजकुमारी मधु आणि कृति), पूजा हेगड़े (राजकुमारी माला आणि पूजा), आणि कृति खरबंदा (राजकुमारी मीरा आणि नेहा )शी लग्न करण्याचं ठरवतात. मुलीचे वडिल (रंजीत) लग्न सितमगडला करण्याचा हट्ट करतात. सितमगडचं आणि अक्षय, रितेश आणि बॉबीचं 600 वर्षांशी असलेलं नातं अचानकपणे समोर येतं. मग सुरु होते धमाल. 
दिग्दर्शन:
मागील तीन भागांचं दिग्दर्शन साजिद खानने केलं होतं तर या भागचं दिग्दर्शन फरहाद सामजीने केलं आहे. 1409 आणि 2019मधील विनोदी दुवा सांधणं दिग्दर्शक फरहाद सामजीना उत्तम जमलं आहे. त्यामुळेच सिनेमा कुठेही रेंगाळलेला न वाटता पकड घेतो.
अभिनय: 
अक्षय रितेशचं कॉमेडी टायमिंग, तीनही अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज या सिनेमात परफेक्ट जमला आहे. या सहाजणांशिवाय चंकी पांडे, जॉनी लीव्हर यांच्या कॉमिक टायमिंगने वरताण केली आहे. 
सिनेमा का पाहावा?: 
दिवाळीच्या आनंदी मुडला अणखी आनंदी बनवण्यासाठी हा सिनेमा परफेक्ट आहे. रोजच्या टेन्शनपासून लांब जाऊन मनमुराद हसायचं असेल तर हा सिनेमा जरुर पाहावा.

Recommended

PeepingMoon Exclusive