By  
on  

प्रियांका निकची लग्नानंतरची पहिली दिवाळी

दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण. सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींनासुध्दा ह्या सणाचं तितकंच अप्रूप आहे. लग्नानंतर परदेशात वास्तव्यास असलेली बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रासाठी ही दिवाळी खुपच खास आहे. लग्नानंतरची तिची आणि निकची ही पहिली दिवाळी. परदेशात राहूनही प्रियांका आपले भारतीय संस्कार वं परंपरा अजिबातच विसरलेली नाही. 

 

ग्लोबल सेलिब्रिटी कपल निक व प्रियांकाने आपली पहिली-वहिली दिवाळी यूएसमध्ये साजरी केली.ह्या  सेलिब्रेशनचे फोटो तिने स्वत: सोशल मिडीयावर चाहत्यांसोबत शेयर केले.  दिवाळसणाच्या निमित्ताने प्रियांकाचा एथनिक अवतार दिसला. गोल्डन फ्लोरल साडीत ती खूप सुंदर दिसत होती. तर निक व्हाईट शर्ट आणि ग्रे पॅंण्ट ह्या आऊटफिटमध्ये पाहायला मिळाला. 

 

 

प्रियांकाने आपल्या रोषणाईने सजावट केलेल्या यूएसमधील घराचे आणि मित्रपरिवाराचे फोटो शेयर केले आहेत. यावरुनच तिने किती दणक्यात दिवाळी साजरी केलीय याची कल्पना येतेय. 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive