By  
on  

पाहा सैफ-तैमूरचा हा फोटो, 'जसा बाप तसा बेटा'

म्हणतात ना जसा बाप तसा बेटा. तसंच काहीसं बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि त्याचा अडीच वर्षांचा लाडका लेक तैमूर यांच्यासोबत झालं आहे. सैफ-करिनाचा लाडका तैमूर हा त्या दोघांपेक्षा जास्त लाईमलाईटमध्ये असतो. त्याचम बोलणं त्याचं चालणं त्याची स्टाईल ही नेहमीच प्रसिध्दी माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरतो. त्याचा निरागसपणा सर्वांनाच हवाहवासा वाटतो.तैमूर त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करण्याची कोणतीच संधी सोडत नाही.

नुकताच तैमूर  त्याच्या आईसोबत म्हणजेच करिना कपूरसोबत तो एअरपोर्टवर स्पॉट झाला. तेव्हा त्याने अगदी स्टाईलिश कपडे परिधान केलेले. त्याच्या व्हाईट टी-शर्टवरसुध्दा  'आय लव्ह मॉम'  असं लिहलेलं पाहायला मिळालं. पण खास म्हणजे इथे तैमूर आपले वडील सैफ अली खानला तंतोतंत फॉलो करतोय, हे दिसून आलं. दोघांनीसुध्दा एकसारखेच काऊबॉय शूज घातले आहेत. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive