By  
on  

रणवीर सिंग चौथ्यांदा संजय लीला भन्साळींसोबत काम करणार?

संजय लीला भन्साळींसोबत तीन सिनेमांमध्ये काम केलेला रणवीर पुन्हा एकदा त्यांच्या आगामी सिनेमात झळकण्याची शक्यता आहे. अजून पर्यंत भन्साळी यांच्याकडून कोणतीही घोषणा केली नसली या चर्चेला जोर आला आहे. भन्साळी त्यांच्या आगामी ‘बैजू बावरा’ या सिनेमाची तयारी करत आहेत. एका गायकाच्या सुडाची गोष्ट या सिनेमात दिसणार आहे.

रणवीर या सिनेमात मुख्य भूमिका साकारु शकतो. हे झालं तर संजयसोबत रणवीरचा हा चौथा सिनेमा असेल. संजय दिग्दर्शित करत असलेला हा सिनेमा 15व्या शतकातील प्रख्यात संगीतकार ‘बैजू बावरा’ यांच्या जीवनावर बेतलेला आहे. त्याने प्रख्यात संगीतकार तानसेन यांना संगीत द्वंद्वासाठी आव्हान दिलं होतं.

वडिलांच्या मृत्यूला तानसेन जबाबदार असल्याची त्याची धारणा होती. या सुडकथेवर बैजू बावरा हा सिनेमा आधारलेला आहे. 2021च्या दिवाळीत हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येईल.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive