By  
on  

‘रणवीरला कार्यक्रमासाठी बुक करायचं तर माझ्याशी संपर्क साधा’, दीपिकाची मजेदार कमेंट

बॉलिवूडमधील पॉवर कपलचा मान निर्विवादपणे रणवीर-दीपिकाकडे आहे. त्यामुळेच सिनेमातही नाही सोशल मिडियावरही दोघांना एकत्र पाहण्यास चाहते आतुर असतात. अलीकडेच रणवीर दीपिकाचा सोशल अपिअरन्स असा होता की चाहत्यांचं चांगलंच मनोरंजन झालं.

रणवीरने त्याचा निळ्या रंगाच्या शेरवानीमधील फोटो शेअर केला होता. या फोटो खाली कॅप्शन होतं की, लग्नाचा सिझन आला आहे. मनोरंजन करण्यासाठी उपलब्ध असलेली व्यक्ती. सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांसाठी तयार.’ रणवीरच्या या फोटोवर लाईक्सचा पाऊस पडू लागला. यावेळी दीपिकाच्या कमेंटने मात्र नेटझन्सचं लक्ष वेधलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Shaadi Season is here! Entertainer for Hire. Available for events, wedding, budday party, mundan

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

 

रणवीरच्या या पोस्टला कमेंट करताना दीपिका म्हणते, “रणवीर सिंहला तुमच्या पार्टीत बोलवायचं असेल तर दीपिका पदुकोणशी संपर्क साधा’. यानंतर नेटिझन्सनी या दोन्ही पोस्ट्वर अनेक कमेंट्स केल्या.

 

Recommended

PeepingMoon Exclusive