By  
on  

नागपूर पोलिसांनी रणवीरला दिलं हे भन्नाट उत्तर, वाचा सविस्तर

नेहमीच आपल्या भन्नाट आणि अंतरंगी वेशभूषेसाठी प्रसिध्द असलेला बॉलिवुडचा एनर्जी मॅन  रणवीर सिंग सोशल मिडीयावर जबरदस्त अॅक्टीव्ह असतो. अनेकदा चित्रविचित्र असे स्वत:चे फोटो पोस्ट करणं आणि मग युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रीयांना उत्तरं देणं यात तो नेहमीच पुढे असतो. इतकंच नाही तर पत्नी दीपिका पादुकोणच्या सोशल पपोस्टवरसुध्दा तो अनेकदा गमतीशीर कमेंट्स करताना पाहायला मिळतो. पण नुकतीच एक खळबळजनक बाब म्हणजे रणवीरच्या एका सोशल मिडीया पोस्टला चक्क नागपुर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. आश्चर्य वाटलं ना, वाटणारचं.

झालं असं की, रणवीर सिंगने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर लॅण्डलाइन फोनवर बोलतानाच्या पोजमधील स्वत:चा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये रणवीर रेट्रो लूकमध्ये दिसत आहे. सहा नोव्हेंबरला ट्विट केलेला. या फोटोत रणवीरने पांढरा शर्ट, पिवळ्या रंगाची  पॅण्ट आणि गळ्यात स्कार्फ असा भन्नाट पोषाख परिधान केला आहे. तो लाल रंगाचा लॅण्डलाइन फोन हातात घेऊन उभा आहे. १९९९ सालच्या 'हसीना मान जाऐगी' सिनेमामध्ये गोविंदा आणि करिष्मा यांच्यावर चित्रित झालेल्या लोकप्रिय गाण्याच्या ओळी रणवीरने या फोटोला कॅप्शन म्हणून वापरल्या होत्या. रणवीरने ‘वॉट इज मोबाईल नंबर? वॉट इज यूआर स्माइल नंबर?, वॉट इज यूआर स्टाइल नंबर? करु क्या डायल नंबर?’, असे कॅप्शन म्हणून पोस्ट केल्या. 

रणवीरच्या या फोटो आणि कॅप्शनवर ट्विटर युजर्सचा अक्षरश: लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव पडला आहे. पण एका ट्विट प्रतिक्रियेने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे आणि तेही नागपूर पोलिसांचं भन्नाट ट्विट. नागपूर पोलिसांनी रणवीरचे हे ट्विट रिट्विट करुन कोट करत ‘१००’ असे उत्तर दिले आहे. म्हणजेच आमचा फोन नंबर १०० असल्याचे नागपूर पोलिसांनी म्हटले आहे, यामुळे सोशल मिडीयावर हास्याची लाट उसळली आहे. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive