अनुष्का आणि विराट बी टाऊनमधील सर्वात हॉट व मोस्ट फेव्हरेट कपल. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. दोघांचीही क्षेत्र वेगवेगळी असली तरी आपल्या बिझी शेड्यूलमधून एकमेकांसाठी नेहमीच क्वालिटी टाईम देताना पाहायला मिळतात. त्यांच्या अफलातून लव्ह केमिस्ट्रीचं सर्वांना नेहमीच अप्रूप वाटतं.
पण तुम्हाला हे माहितीय का, अनुष्का तिचा क्रिकेटर पती विराट कोहलीच्या वॉर्डरोबमधून टी-शर्ट्स आणि जॅकेट्स घेऊन ते परिधान करते. आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण ही गोष्ट खरी आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अनुष्काने आपण विराटचे कपडे कधी कधी वापरतो, या गोष्टीचा खुलासा केला. तसंच ती हे ब-याचदा करते कारण ह्यामुळे विराट खुप आनंदी होतो. त्याला अनुष्का त्याचे कपडे वापरते ह्याचा आनंद होतो.
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीतील लेक कोमो परिसरात फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.
(Source: Vogue)