By  
on  

पाहा कपिल देव यांच्या फेमस 'नटराज शॉट'सह रणवीर सिंहच्या '83 द फिल्म'चं नवं पोस्टर

बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंह कपिल देव यांच्या भूमिकेत '83 द फिल्म' या मोस्ट अवेटेड सिनेमात झळकतोय. मागच्याच महिन्यात या सिनेमाची शुटींग पूर्ण झाली आणि संपूर्ण टीमने रॅप अप पार्टीत धम्माल उडवून दिली होती. आता सिनेमाच्या मेकर्सनी या सिनेमातील रणवीर सिंहचा आणखी एक नवा लुक उलगडला आहे.

ह्यात कपिल देव यांची प्रसिध्द नटराज पोझ रणवीर सिंहने धारण केली आहे आणि यात तो हुबेहुब कपिल देवच दिसतोय. रणवीरची मेहनत हा लुक पाहून फळाला आली असंच म्हणावं लागेल. 

1983 च्या वर्लडकपमध्ये कपिल देव यांनी झिम्बॉबेविरुध्द 175 रन्सची खेळी केली होती. ही भारत- झिम्बॉम्बे मॅच सर्वात अविस्मरणीय अशी ऐतिहासिक मॅच आहे. पण त्याचं प्रसारण आज उपलब्ध नाही, कारण तेव्हा ही मॅच चित्रितच करण्यात आली नव्हती. 

ज्या सिनेमाची निर्मितीपासून चर्चा आहे, तो सिनेमा म्हणजे ‘83 द फिल्म ’. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा १९८३मध्ये वर्ल्डकप जिंकलेल्या टीमवर आधारित बायोपिक आहे.  दीपिका पादुकोण ह्यात कपिल देव यांची पत्नी रोमी देवची भूमिका साकारतेय. दीप-वीरचा लग्नानंतरचा एकत्र हा पहिलाच सिनेमा. 

‘83 द फिल्म ’ हा मल्टिस्टारर सिनेमा पुढच्या वर्षी 10 एप्रिल  2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive