By  
on  

माझं काम अभिनय करणं आहे, राजकारण मी माझ्या भावांवर सोपवलंय : रितेश देशमुख

रितेश देशमुख या मराठमोळ्या तरुणाने बॉलिवुडमध्ये स्वत:च्या अभिनयाच्या जोरावर आपले  पाय रोवले. कमालीचा सेन्स ऑफ ह्युमर, मस्तीखोर अंदाज आणि सहज-सुंदर परफॉर्मन्स यामुळे त्याने प्रेक्षकांना अल्पावधितच आपलंसं केलं. मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून त्याने या गोष्टीचा आपल्या अभिनय कारकिर्दीसाठी कधीच फायदा करुन घेतला नाही.  

सर्वांच्या लाडक्या रितेशचा ‘मर जावां’हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात रितेशने बुटका खलनायक रंगवला आहे. म्हणूनच  ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये सिनेमाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  

रितेश देशमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील महत्त्वाचे नेते दिवंगत विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. विलासराव देशमुख यांची दोन्ही मुले आज आमदार आहेत. मात्र, रितेश बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. त्यामुळे राजकारणातील वारसा हक्क सोडून रितेश झगमगत्या मनोरंजन क्षेत्राकडे कसा वळला हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. 

एका मुलाखतीमध्ये रितेशला हेच राजकारणाऐवजी  इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यामागील कारण विचारले. त्यावर रितेशने म्हणतो ‘मी स्वत:चे निर्णय स्वत: घेतो. पण मी इतरांच्या सल्ल्यांचा देखील मान ठेवतो. माझे काम सिनेमात अभिनय करणे आहे. मी राजकारण माझ्या भावांकडे सोपवले आहे’असे म्हणाला. तसंच तो पुढे म्हणतो "मी लहानपणापासुन सत्ता काय असते सत्तेचं गणित काय आहे, हे अनुभवलं आहे पण मला कधीच सत्तेचं आकर्षण वाटलं नाही."

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive