By  
on  

शाहरुखने केली आलिया-रणबीरच्या ‘ब्रम्हास्त्र’ च्या शुटिंगला सुरुवात

‘ब्रम्हास्त्र’ हा सिनेमा आलिया-रणबीर आणि अमिताभ बच्चन यांचा आहे हेच आपल्याला इतके दिवस माहिती होतं. पण या यादीत आता आणखी एका कलाकाराची भर पडली आहे. बादशहा शाहरुख खान या सिनेमात झळकणार असल्याचं समोर आलं आहे. 2018 च्या ‘झिरो’नंतर शाहरुख या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आला आहे. शाहरुखच्या एका फॅनने ट्वीट करत ही बातमी शेअर केली. 

 

 

या पोस्टचा पुरावा म्हणून त्याने एक फोटो शेअर केला आहे. त्यात लिहिलं आहे. "SRK ब्रह्मास्त्र के साथ नाइट शेड्यूल 11वां दिन.'  शाहरुख या सिनेमात कॅमिओ करणार असल्याच्या चर्चा आहेत. याशिवाय  अक्किनेनी नागार्जुन देखील यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे. या सिनेमात रणबीर-आलियाशिवाय मौनी रॉय, डिंपल कपाड़िया, प्रतीक बब्बर, दिव्येंदु शर्मा, विशाल करवाल आणि सौरव गुर्जर हे देखील आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive