By  
on  

पिपिंगमुनची बातमी झाली खरी, महेश मांजरेकरांच्या आगामी वेबसीरिजमध्ये झळकणार अभय देओल

अभिनेता अभय देओल हा बॉलिवूडमधील निवडक तरीही उत्तम भूमिका करणारा अभिनेता. 'हैप्पी भाग जाएगी' सिनेमाच्या दोन वर्षानंतर अभय देओल शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरीना कैफ यांच्या 'झिरो' सिनेमामध्ये दिसला होता. पीपिंगमून. कॉमने याआधी तुम्हाला सांगितलं होतं की अभय देओल हॉटस्टारवरील एका वेब शो मध्ये पाहायला मिळणार आहेत. परंतु आता या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महेश मांजरेकरांच्या आगामी वेबसीरिजमध्ये अभय देओल महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. 

पिपिंगमुनच्या सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार ही वेबसिरीज भारत आणि चीनच्या युद्धावर आधारित आहे. या वेबसीरिजमध्ये सैनिकांच्या जीवनाचं चित्रण दिसणार आहे. या वेबसीरिजमध्ये निर्मात्यांनी अभय देओलला नायकाच्या रूपात निवडले आहे. या वेबसीरिजमध्ये अन्य कोणते कलाकार काम करणार आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

 

अभय देओलने वेबप्लॅटफॉर्मवर इतकं काम केलं नसलं तरी गेल्या वर्षी नेटफ्लिक्स वरील 'चॉपस्टिक' या वेबसीरिजमध्ये अभय देओलने काम केले आहे. चॉपस्टिक मध्ये मिथिला पालकरने अभय देओलने काम केले आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive