अजय देवगण स्टारर बहुचर्चित 'तानाजी : द अनसंग वॉरियर' सिनेमांतील एक बहुप्रतिक्षीत लुक आज उलगडला. सावित्रीबाई मालुसरे ही शिवरायांच्या मर्द मराठा शिलेदार तानाजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका काजोल साकारतेय हे आपण सर्वच जाणतो. पण या सिनेमातील तिचा लुक नुकताच सोशल मिडीयावरुन सर्वांसमोर आला आहे. या मराठमोळ्या साज लेवून काजोल पाहताच क्षणी प्रेक्षकांना भावतेय.
नऊवारी साडी, डोक्यावर पदर, गळ्यात दोडलं, ठसठसशीत कानातले, कपाळावर गडद कुंकू आणि नाकात भलीमोठी नथ अशा सावित्रीबाईंच्या रुपातील काजोल अगदी उठून दिसतेय.
ओम राऊत दिग्दर्शित 'तानाजी: द अनसंग वॉरियर' मध्ये अजय देवगण, सैफ अली खानसह अभिनेत्री काजोल सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे. हा सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.