By  
on  

‘गुड न्युज’ आणि ‘लाल सिंह चढ्ढा’ साठी करीनाची अशीही तारेवरची कसरत

सुपर मॉम करीना सध्या सुपर बिझी आहे. याला कारण आहे तिचे सिनेमे. करीना मध्यंतरी चंढीगडमध्ये ‘लाल सिंह चढ्ढा’च्या शुटिंगमध्ये बिझी होती. या सेटवरील तिचे फोटोही व्हायरल झाले होते. पण आज तिच्या आगामी ‘गुड न्युज’ सिनेमाचा ट्रेलर लाँच होणार होता.

 

या लाँचिंगला उपस्थित राहणं तिच्यासाठी अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे तिने ‘लाल सिंह चढ्ढा’चं शुटिंग शेड्युल अत्यंत घाईत पूर्ण केलं. राज मेहता दिग्दर्शित 'गुड न्यूज' हा सिनेमा 27 डिसेंबर, 2019 ला  रिलीज होत आहे. या सिनेमात करीना सोबत अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी हे कलाकार देखील आहेत.

 

Recommended

PeepingMoon Exclusive